मैत्री तुझी आणि माझी
मैत्री तुझी आणि माझी
जशी चंद्र आणि ताऱ्यांची
त्यांच्यासारखी चमचमणारी
तितकीच हवीहवीशी वाटणारी
मैत्री तुझी आणि माझी
जशी पेनाची आणि कागदाची
त्यांच्यातील चिरंतर सोबतिची
आणि तितकीच अमूल्य किंमतीची
मैत्री तुझी आणि माझी
जशी नदी आणि सागराची
कुठेही भरकटली तरी
शेवटी एकत्र येऊन मिळणारी
मैत्री तुझी आणि माझी
जशी दिवा आणि वातीची
अंधारात प्रकाश देणारी
आणि लाईटीची उणीव भरुन काढणारी
मैत्री तुझी आणि माझी
जशी विटी आणि दांडूची
जितकी कोलवावी तितकी अंतर भेदनारी
दूरचे अंतर भेदूनही पुन्हा डाव मांडणारी
मैत्री तुझी आणि माझी
जशी घड्याळाची त्याच्या काट्याशी
केंद्रकाभोंवती गरगर फिरनारी

No comments:
Post a Comment