*मोडेन पण वाकणार नाही*
कवी: संतोष पाटील
9503049624
आयुष्याचा खेळ असा
मी अर्ध्यावर सोडणार नाही
कितीही थैमान घालो संकट
मोडेन पण वाकणार नाही
फेसाळलेल्या दर्यामध्ये
नाव माझी थरणार नाही
उसळल्या बेछूट लाटा तरी
दर्यात विलीन होणार नाही
झाले कितीही आघात मनावर
अपयशाने मी खचनार नाही
दुःख झाले डोईजड जरी
माघार मनास पचनार नाही
हरलोच जरी संकटांपुढे
लढणे कधी थांबणार नाही
झालाच देहाचा अग्नी जरी
ध्येयास कधी जाळणार नाही
गुरफटलो विचारांच्या गर्दीत जरी
अविचाराने कधी वागणार नाही
मोडलाच पाठीचा कणा जरी
मोडेन पण वाकणार नाही
No comments:
Post a Comment